पुणे -आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी दावा दाखल केला आहे. दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असे नमूद केले आहे.
आमदार शिरसाट यांनी केलेल्या टिप्पणीनंतर अंधारे यांच्या वतीने मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी ऍड. तौसिफ शेख व ऍड. क्रांतीलाल सहाणे यांमार्फत दावा दाखल केला.
दिवाणी दाव्यात न्यायालयामार्फत शिरसाट यांना नोटीस काढण्यात येईल. तर, फौजदारी दाव्यात त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश होतील अन्यथा त्यांविरोधात समन्स काढण्यात येतील, अशी माहिती अंधारे यांचे वकील ऍड. शेख व ऍड. सहाणे यांनी दिली. याखेरीज, ऍड. दीपक गायकवाड, ऍड. स्वप्नील गिरमे, ऍड. महेश गवळी यांनी याप्रकरणात काम पाहिले.