वाघोली, (प्रतिनिधी) –केंद्रीय खेल मंत्रालय अंतर्गत रूरल गेम्स ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित 11व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये वाघोली येथील तीन मुलींनी यश संपादित केले.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन 17 व 18 फेब्रुवारी रोजी खोपोली रायगड येथे करण्यात आले होते. 14 वर्षांवरील वयोगटामध्ये तोषा पेंडके हिने एक सुवर्ण, एक रौप्य पदक मिळविले. 6 वर्षांखालील वयोगटामध्ये श्रीशा शिरभाते हिने दोन कांस्यपदक मिळविले.
5 वर्षाखालील वयोगटामध्ये अन्वी कनोजे हिने दोन कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, हरयाणा, दिली, कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच देशभरातल्या विविध राज्यातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यांच्या यशामध्ये पालक व प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.