वाठार स्टेशन पोलिसांची कारवाई
वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनपटवाडी (ता. कोरेगाव) येथील नऊ जणांविरुद्ध वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनपटवाडी येथे डोंगराच्या पायथ्याशी खोरी येथे विकास चंद्रकांत बोबडे, शरद विठ्ठल अनपट , शेख मामा ,सुरेश बोबडे, संतोष बोबडे , नंदकुमार बोबडे ,शंकर बोबडे ,प्रकाश चव्हाण व सुनील बोबडे यांनी पत्ते खेळण्यासाठी तोंडाला मास्क न लावता एकत्र जमून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत पुढील तपास पोलिस हवालदार चोरट करीत आहेत.