बॉलीवूडमधील परफेक्टनिस्ट अर्थात आमीर खान आपल्या आगामी “लाल सिंह चढ्ढा’ची शूटिंग तुर्कीत सुरू करणार आहे. भारतात करोना महामारीचा संसर्ग होण्यापूर्वीच चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले होते. परंतु आता याचे शूटिंग तुर्कीत करण्यात येत आहे. सोशल मीडियावर आमीर खानचे काही फोटो व्हायरल होत आहे. देशात करोनाचा कहर सुरूच असल्याने आमीरने शूटिंग तुर्कीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
“लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट रॉबर्ट जॅमॅकिसद्वारा दिग्दर्शित 1994मध्ये प्रदर्शित झालेल्या “फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. याचे शूटिंग या वर्षाच्या प्रारंभी कोलकाता आणि चंदीगढ येथे सुरू करण्यात आले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ते शूटिंग बंद करण्यात आले.
दरम्यान, आमीरशिवाय अक्षय कुमारही आपल्या आगामी “बेल बॉटम’चे शूटिंग करण्यासाठी विदेशात गेलेला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख झळकणार आहे.