बीड – अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. सर्व गणेशभक्तांना गणरायाच्या आगमानाचे वेध लागले आहे. मार्केटमध्येही आकर्षक गणेश मूर्ती आल्या आहेत, सजावटीचे सामनाने दुकाने सजली आहे.
View this post on Instagram
अशात सोशल मीडियावर बाप्पाच्या स्वागत करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशात बीड येथील एका मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे नाव साईराज केंद्रे असून परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी या गावात राहातो.
या व्हायरल व्हिडिओमध्ये हा चिमुकला भारी नाचताना दिसत आहे. आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर या चिमुकल्याने व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडीओ गणेश केंद्रे यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे. दरम्यान हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे तर अनेक जण व्हिडीओवर कमेंट करत आहे. एका लिहिले, ”टुकुमुक बघतोय चांगला; किती छान अक्टिंग करतो”
साईराजला डान्स सोबतच हनुमान चाळीसही तोंडपाठ आहे. त्याचे वडील गणेश केंद्रे नेहमीच इंस्टाग्रामवर साईराजचे व्हिडिओ शेअर करत असतात. आता पर्यंत या व्हिडिओला ३.२ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून लाखो नेटकऱ्यांनी या मुलाचं कौतुक केल आहे, तो सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर करत असतो. हा व्हिडीओ ganeshkendre7707 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ३.२ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून लाखो नेटकऱ्यांनी या मुलाचं कौतुक केलं आहे.