मुंबई – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टितील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते. नुकतेच तिने तिचे काही सुंदर फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात तिने केस मोकळे सोडले आहेत आणि एकापेक्षा एक असे हटके पोज दिल्या आहेत. सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याशिवाय तिने तिचे आणखी काही वेगळ्या लुकमधील फोटोही शेअर केले आहेत. या फोटो मध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाचा सुंदर घागरा परिधान केला आहे. यावर लाल रंगाच्या फुले आहेत.
View this post on Instagram
हा लुक तिने ‘सारेगमप लिटिल चॅम्प’साठी केला होता. यात ती प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहिली होती. दरम्यान, सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीचे नुकतेच ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.