देऊळगाव जहाँ येथील युवकाची पुण्यात गळफास
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील देऊळगाव जहाँ येथील सुशिक्षित युवकाने आपल्या आई-वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण न करता आल्याने पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रामेश्वर भारत कांबळे (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. रामेश्वर आपल्या घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने घरच्यांना हातभार लावलण्यासाठी पुणे या ठिकाणी कंपनीत काम करत होता.सोबतच पोलिस,आर्मी भरतीची तयारीदेखील करत होता.
मागील तीन चार वर्षात त्याने अनेक भरत्यामध्ये सहभाग देखील घेतला होता मात्र यामध्ये त्याला यश मिळाले नाही. आपण आई वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण करु शकलो नाही. याच नैराश्येतून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.
नेमके काय लिहले होते चिट्ठीमध्ये…
आई-पप्पा दादा मला माफ करा, मी तुम्हाला दाखविलेले स्वप्न पूर्ण करु शकलो नाही. मला आता पुढचा रस्ता दिसत नसल्याने हाच मला शेवटचा पर्याय वाटत आहे. माझ्यामुळे कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मी सर्वांची माफी मागतो मला माफ करा
Sorry,
अशा आशयाची चिठ्ठी गळफास घेतलेल्या ठिकाणी आढळून आली आहे.