पिंपरी – गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका तरुणाला सव्वा किलो गांजासह अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) दुपारी पावणे तीन वाजता थेरगाव येथे करण्यात आली. विकास सुभाष काळे (वय 23, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई धनाजी शिंदे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
थेरगाव येथे डांगे चौकाकडून रावेत कडे जाणाऱ्या रस्त्याच्या फूटपाथवर एक तरुण गांजा घेऊन थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून विकास याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 33 हजार 475 रुपये किमतीचा एक किलो 257 ग्रॅम वजनाचा गांजा आणि गांजा विक्रीतून मिळालेली दोन हजार 50 रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.