प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकारचा भाजपमध्ये प्रवेश

कोलकाता – प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला आणि वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजप प्रचंड जोमाने कामाला लागली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांना देखील भाजपने आपल्या बाजूला वळवले आहे.

आता तर थेट बंगाली सिनेमामधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकार हीला आपल्या पक्षात सामील करुन घेण्यात भाजपला यश आले आहे.

भाजप प्रवेशाच्या कार्यकम्राचे कोलकात्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पायल सरकार या बंगाली अभिनेत्रीने भाजपचे कमळ हाती घेतले. या कार्यक्रमाला भाजपचे क्रेंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष उपस्थित होते.

पायल सरकार ही बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेत्रींपैकी एक आहे.मॉडेलींगपासून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या पायलला बंगाली चित्रपटांची संधी मिळाली. तिने 2006 साली बिबर या चित्रपटातून बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.