पुणे – शहर परिसरात तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. मात्र पुढील आठवडाभर हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याने, पुणे शहर परिसरात थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच ते सहा दिवस हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान या भागात थंडीची लाट असणार आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रासह जिल्ह्यात थंडी कायम राहणार आहे.