मुंबई – १०० दिवस, १७ सदस्य आणि एक ट्रॉफी! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होते विजेता कोणी एकच असणार आहे. कार्यक्रमाच्या तिसर्या पर्वाला देखिल संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले.
प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. मग ती टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो.
असच एक नातं यंदाच्या सिझन मध्ये दिसून आलं. आणि ते म्हणजे विशाल निकम आणि विकास पाटील यांच्यामध्ये. घरातील त्यांची जिवाभावाची असणारी मैत्री प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरली आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या नंतर विशाल आणि विकास हे दोघे जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. सध्या या दोघांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या तिसर्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला होता. आणि विशाल निकम यंदाच्या सीझनचा महाविजेता ठरला. यावेळी त्याला ट्रॉफी आणि २० लाख इतकी धनराशी मिळाली देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले होते.