असा खेळाडू पुन्हा होणे नाही

फुटबॉलच्या दंतकथेला क्रीडाविश्‍वाची आदरांजली

ब्युनोस आयर्स  – अर्जेंटिनाचे माजी प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या निधनानंतर जगभरातील क्रीडापटूंनी आदरांजली वाहिली आहे. मी एक जवळचा मित्र तर जगाने महान फुटबॉलपटू गमावला. असा खेळाडू पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

मॅराडोना यांचे बुधवारी वयाच्या 60 व्या वर्षी राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. जगभरातील फुटबॉल चाहत्यांप्रमाणे भारतातही त्यांचे करोडो चाहते आहेत. त्यांनी केरळ, कोलकाता या फुटबॉलवेड्या शहरांनाही दिलेली भेट गाजली होती. त्याच आठवणीत बीसीसीआयचे अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीही रमले. जगाला फुटबॉल पाहण्याची गोडी लावणारा आपल्या सर्वांचा हिरो काळाच्या पडद्याआड गेला, त्यांच्या खेळाची आठवण कायम राहील, असे गांगुली यांनी म्हटले आहे. 

1960 ते 2020 या साठ वर्षांच्या कालखंडात पेले यांच्या पाठोपाठ मॅराडोना यांचे नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 91 सामन्यांत 34 गोल केले. तसेच क्‍लब फुटबॉलमध्येही त्यांनी नापोली, बोका ज्युनियर्स व बार्सिलोना यांच्याकडून खेळ केला. 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना 1997 साली त्यांनी निवृत्ती घेतली. या काळात त्यांनी चारशेपेक्षा जास्त सामने खेळताना 250 पेक्षा जास्त गोल केले.

चार विश्‍वकरंडक स्पर्धांमध्ये सहभागी होताना अर्जेंटिना संघाला जागतिक वर्चस्व मिळवून दिले. 1986 साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चक्क हाताने केलेला गोल हॅण्ड ऑफ गॉड ठरला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला उजाळा देताना पेले, गांगुली, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांच्यासह अनेक क्रीडापटूंनी आदरांजली वाहिली आहे.

अर्जेंटिनामध्ये तीन दिवसांचा दुखवटा …

मॅराडोना हे काही सरकारी पदावरील व्यक्‍ती नव्हते. मात्र, देशासाठी खेळताना त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीमुळे त्यांना देशस्तरावर मान देत अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बेटरे फर्नाडेझ यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. असा मान मिळालेले मॅराडोना पहिलेच फुटबॉलपटू ठरले आहेत.

स्टेडियमला नाव देणार …

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील साओ पावलो या प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियमला दिएगो मॅराडोना यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाणार आहे. मॅराडोना यांचे अर्जेंटिनाकडून फुटबॉल क्षेत्रातील योगदान तसेच येथील नापोली क्‍लबकडून केलेली कामगिरी लक्षात घेत या स्टेडियमला त्यांचे नाव देऊन मॅराडोना यांचा गौरव केला जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.