अभिनेत्री काजोल ही 2021 वर्षाबद्दल खूप आशावादी आहे आणि या वर्षासाठी तिने काही लक्ष्य निश्चित केली आहेत. ती म्हणते, “आम्हाला 2020 मध्ये नको असतानाही ब्रेक मिळाला होता आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र, आत्मविश्वास नसल्यास हे वर्षही आपल्या निराशाजनक ठरेल.
यासाठी उत्तम आरोग्य, जास्तीत जास्त काम आणि चांगले निकाल मिळविणे हे या वर्षाचे प्राथमिक लक्ष्य असले पाहिजे. वर्ष 2021 हे निश्चितच आपल्यासाठी बऱ्याच नवीन आणि अनोख्या संधी देईल, असे सांगत काजोलने चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. यावर असंख्य चाहत्यांनी काजोलचे समर्थन करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास काजोल लवकरच “त्रिभंगा’ चित्रपटातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले नशीब आजमविणार आहे. या चित्रपटाची कथा मुंबईवर आधारित आहे. यात एका कुटुंबातील तीन पिढींमधील फरक दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे करणार आहे.
दरम्यान, काजोल अखेरच्या वेळी गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर “तानाजी ः द अनसंग वॉरियर’मध्ये दिसली होती. यात तिचा पती, अभिनेता अजय देवगण याने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती.