बाधितांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस घटत असले तरी गेल्या 24 तासांत पुन्हा 182 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 97 हजार 973 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शनिवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 183 जणांना करोनाची लागण झाली असून, शहराबाहेरील एकाही व्यक्तीचा करोना अहवाला सकारात्मक आलेला नाही.
तर गेल्या 24 तासांत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील मयत 62 वर्षीय पुरुष मारुंजी येथील रहिवाशी होते. तर मयत 74 वर्षीय महिला या आळंदी येथील रहिवाशी होत्या. आतापर्यंत शहरातील मृतांचा आकडा 1 हजार 772 वर पोहोचला. शहराबाहेरील 738 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2 हजार 510 ची संख्या आज गाठली.
आतापर्यंत शहरातील 94 हजार 479 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 7 हजार 461 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 3 हजार 424 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयीत असलेले 2 हजार 584 जण महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.