कराड -ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठीमागील पाठा तुटल्याने येथील विजय दिवस चौकात हा ट्रक उलटला. मंगळवार दि. 28 रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक उलटल्यामुळे रस्त्यावर उसाचा खच पडला होता.
याबाबक घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की, मायणी येथून उसाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच – 04-बीजी- 3740) हा येथील स्टेशन रोड मार्गे चांदोली जवळील असलेल्या निनाईदेवी शुगर मिलकडे निघाला होता.
कराड शहरातील विजय दिवस चौकात सिग्नलजवळ आल्यानंतर ट्रकचा पाठीमागील पाठा अचानक तुटला. त्यामुळे ट्रकची पाठीमागील दोन्ही चाके बाजूला तुटून गेलेली. ट्रकमधील उस रस्त्यावर पसरला गेल्याने स्टेशन रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.
या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. पोलिसांना याबाबतची माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच लोकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेला उस बाजूला करण्यात आला. त्यामळे त्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.