सातारा, (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर लिंब, ता. सातारा येथे काल (दि. 9) सकाळी 9.30 च्या सुमारास टॅ्रक्टरला (एमएच-11-यू-5676) जोडलेल्या ट्रॉलीची दुचाकीला (एमएच-11-बीजी-7398) धडक बसली.
या अपघातात हृषीकेश मारुती दाभाडे (वय 20) व सारंग संतोष कुंभार (वय 18, रा. बावधन, ता. वाई) हे जखमी झाले आहेत. याबाबत अशोक दत्तात्रेय दाभाडे (वय 57, रा. बावधन) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, ट्रॅक्टरचालक उमेश हणमंत माळी (वय 29, रा. जांब, ता. वाई) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
उमेश माळी हा इतर वाहनांना अडथळा आणि लोकांच्या जीविताला धोका होईल, अशा पद्धतीने ट्रॅक्टर चालवत होता. त्यामुळे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची दुचाकीला धडक बसली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार वायदंडे तपास करत आहेत.