संगमनेर – संगमनेरात सुरु असलेला कोरोनाचा कहर संपता संपेना काल (दि 31) दिवसभरात तब्बल 57 करोना बधितांची भर पडली असून दिवसभरात आलेल्या रिपोर्ट मध्ये सकाळी 4 आणि संध्याकाळी 8 असे ऐकून 12 पोलीसाना कोरेनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सकाळी व दुपारी मिळून 27 रुग्ण बाधित असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर संध्याकाळी आलेल्या रिपोर्ट मध्ये 30 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.शहरातील 13 तर तालुक्यात 5 जणांना बाधा झाली आहे. शहरातील रंगार गल्ली येथे तब्बल सहा जण कोरोना रुग्ण आढळून आले. यात 62, 29, 06 वर्षीय महिला व 05 महिन्याची बालिका तर 09 व 27 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
तर माळीवाडा येथे 32 वर्षीय पुरुष, 02 वर्षीय बालिका, मालदाड रोड येथील 30 वर्षीय महिला, पद्मानगर येथील 45 वर्षीय पुरुष, जनतानगर येथे 29 वर्षीय पुरुष व 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर पोलीस कॉलनी येथील 26 वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळून आली.
तर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील 43 वर्षीय पुरुष, निंबाळे येथील 42 वर्षीय पुरुष, कनोली येथील 54 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 39 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन महिला पोलीस व दोन पुरुष पोलीस अशा चार पोलीसांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे चारही पोलीस संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. हे सर्व अहवाल अँटीजन टेस्ट मध्ये आढळून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
तसेच दुसऱ्यांदा आलेल्या अहवालात शासकीय प्रयोगशाळेतील अहवालानुसार देवाचा मळा येथील 30 वर्षीय तरुण ,31 वर्षीय महिला, 7 वर्षीय बालिका, अश्वि येथील 27 वर्षीय तरुणी, घुलेवाडी येथील 9 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालानुसार चिकणी येथील 28 वर्षीय तरुण, महात्मा फुले नगर येथील 29 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात (42) पुरुष ,(38) महिला , (20)मुलगा असे तीन , शिवाजी नगर परिसरात (27) पुरुष मालदाड रोड परिसरात ( 35 )पुरुष , ( 29 )महिला , ( 45 )महिला असे तीन पॉजिटीव्ह आले, घासबजार परिसरात (75) पुरुष, अकोले रोड परिसरात ( 53) पुरुष , ( 38 )महिला, जम जम कॉलनी ( 17 )मुलगा ,(13 )मुलगी ,(40)पुरुष, नवीन नगर रोड ( 61) महिला, तर संगमनेर तालुक्यात घुलेवाडी परिसरात (35 , 37, 42 , 53 , 51, 50 )पुरुष तर (33)महिला असे 7 जण पॉजिटीव्ह आले ,
आंबी खालसा परिसरात (12 , 16 ,18 , 37 ) महिला असे चार, निंभाळे परिसरात ( 30 , 15 )महिला असे दोन, कोल्हेवाडी परिसरात ( 46 ) पुरुष, गुंजाळवाडी परिसरात ( 43 )महिला, कनोली परिसरात ( 30 ) महिला, असे तालुक्यात एकाच दिवशी 57 रुग्ण तसेच राक्षणकर्ते पोलीस 12 जण पॉजिटीव्ह सापडल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या 758 वर पोहचली आहे.