चिंबळी -चिंबळी (ता. खेड) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच, माजी चेअरमन स्व रामचंद्र कातोरे यांचे महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.
कोल्हे म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, यावेळी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, हनुमंत कातोरे, कैलास कातोरे, सचिन कातोरे, तसेच खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे माजी सभापती बाळ ठाकुर, संचालक धैर्यशील पानसरे, कैलास लिंभोरे उपस्थित होते.