निघोज, (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील तीर्थक्षेत्र चोंभूत येथे श्री हनुमान, श्री. कानिफनाथ, श्री. मुक्ताई देवी या ग्रामदैवतांचा यात्रा महोत्सवाचे आयोजन चोंभूत ग्रामस्थांनी केले आहे.
तीन दिवसीय यात्रेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडा शौकीनांसाठी लाखो रुपयांच्या बक्षीसांचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी अभिषेक, मांडवडहाळे, शेरनी प्रसाद, हभ. कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३० व ३१ मार्च तसेच १ एप्रिल रोजी यात्रा असणार आहे.
बैलगाडा शर्यतींसाठी लाखो रुपयांची भव्य बक्षीसे ठेवण्यात आली आहे. यामुळे यात्रेला मोठ्या प्रमाणात बैलगाडा शौकीन हजेरी लावणार आहेत. यात्रेस आ. नीलेश लंके, माजी सभापती मधुकर उचाळे, माजी सदस्य डॉ. भास्करराव शिरोळे तसेच परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच व उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
दि.३१ मार्च रोजी मास्टर रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांचा तमाशा, दि.१ एप्रिल रोजी मंगला बनसोडेसह नितीनकुमार करवडीकर यांच्या तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन चोंभुत ग्रामस्थांनी केले आहे. चोंभूत गावात दोन राजकीय गट आहे.
गावातील अंतर्गत वाद बाजूला ठेऊन आयोजित केलेली यात्रा मोठ्या आनंदाने पार पाडण्यात यावी तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटीबद्ध असल्याची माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.