नवी दिल्ली – पंजाबमध्ये लुधियाणामधील अमृतसह-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर (Amritsar delhi highway) खन्ना येथे सुमारे 50हून अधिक वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली।अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर (Amritsar national highway) पहाटे भीषण आपघात झाला. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे खन्नाजवळ ही वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. (Accident news)
या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. खराब झालेली वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातामध्ये जीवितहानी बरोबरच आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे.
अपघातमध्ये चारचाकी, दुचाकी आणि एका बसचाही समावेश आहे. या भीषण अपघातामुळे अमृतसर दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर वाहतुककोंडीची समस्या निर्माण झाली होती. 35 ते 40 किलोमिटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बसमधून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत.
या अपघातांमध्ये वाहनांची संख्या जास्त असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बसच्या पुढील भागाचे पूर्ण खराब झाला आहे. पोलिसांकडे 25 ते 30 वाहनांची यादी आहे. पुढील तपास सुरू आहे. ज्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या वाहनांची माहिती पोलिसांकडून नोंद करून घेण्यात येत आहे.