Sputnik Vaccine | स्पुटनिक लसीच्या एकाच डोसमध्ये होणार करोनाचा खात्मा; केवळ 10 दिवसांत प्रतिकारशक्‍ती वाढणार असल्याचा कंपनीचा दावा

मॉस्को, दि. 7 – रशियाच्या करोना विषाणूवरच्या स्पुटनिक या लसीबाबत गुरुवारी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, स्पुटनिक व्ही या लसीचे लाईट व्हर्जन फक्‍तएकाच डोसमध्ये विषाणूचा खात्मा करू शकेल. रशियाने म्हटले आहे की, स्पुटनिक व्हीचा लाईट व्हर्जनचा एकच डोस असा आहे जो 80 टक्‍क्‍यांपर्यंत प्रभावी आहे.

कंपनीने असा दावा केला आहे की, स्पुटनिकचे लाईट व्हर्जन हे दोन डोस असलेल्या इतर लसींच्या तुलनेत एकाच डोसमध्ये जास्त प्रभावी आहे. स्पुटनिकच्या या लाईट व्हर्जनच्या वापरासाठी रशियाच्या सरकारकडून मंजुरीही मिळाली आहे.

या व्हर्जनमुळे लसीकरणाला वेग मिळेल आणि करोनाचा प्रसार रोखण्यात मदत होईल. स्पुटनिकने म्हटले आहे की, लसीच्या लाईट व्हर्जनची एकूण परिणामकारकता 79.4 टक्के आहे. 91.7 टक्के लोकांमध्ये फक्‍त28 दिवसांमध्ये प्रतिजैविके तयार झाली आहेत. कंपनीने म्हटले आहे की 100 टक्के लोक ज्यांच्या शरीरात आधीपासूनच प्रतिकारशक्‍ती होती त्यांच्या शरीरातील प्रतिजैविके लस घेतल्यानंतर फक्‍त 10 दिवसांत चाळीस पट वाढली.

या लसीच्या वापराला भारत सरकारनेही मंजुरी दिली आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. या लसीचे 1.5 लाख डोस घेऊन रशियाचे विमान गेल्या शनिवारी हैदराबाद येथे पोहोचले होते. या लसीच्या रूपात देशाला करोनाविरोधातल्या लढाईतले तिसरे हत्यार मिळाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.