बॉलिवूडची देशीगर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनाससोबत अमेरिकेत आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत आपल्या चाहत्यांना दैनंदिन क्रियेशी संबंधित माहिती शेअर करत असते. आता तिने आपला एक मजेदार व्हिडीओ पोस्ट केला आहे.
जगासह भारतातही करोनाविरोधात प्रियांका चोप्रा सतत जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे. तसेच गरजूंना मदत करण्यासाठीही ती सक्रिय सहभाग घेत आहे. जिथे प्रत्येकजण आपल्या वर्कआऊटचे विविध व्हिडीओ पोस्ट करीत आहे. त्यातच प्रियांकाने सर्वात मजेदार मार्ग शोधला आहे.
तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती पलंगावर पाठीवर पडली आहे आणि ती एक मुलगी उचलताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने पोस्ट केले की, “नो जिम, नो प्रॉब्लेम’ असे लिहिले आहे.
दरम्यान, कोविड-19 साठी निधी जमा करण्यासाठी प्रियांकाने डब्ल्यूएचओ बरोबर “वन वर्ल्ड टूगेदर ऍट होम’मध्ये सहभाग घेतला आहे. याशिवाय ती आणखी एका कार्यक्रमातून निधी उभारण्याचे काम करत आहे. यात तिच्यासह बॉलिवूड स्टार कलाकार सहभागी होणार आहेत.
No gym, no problem. pic.twitter.com/nYmhjGd34q
— PRIYANKA (@priyankachopra) May 2, 2020