बेळगाव : कंटेनमेंट झोन वगळता “रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आज म्हणजेच सोमवारपासून दारु दुकाने उघडण्यात आली आहेत. या दुकानांवर सकाळपासूच गर्दी असलेली पाहायला मिळाली. कर्नाटकमधील बेळगावसह अनेक शहरांमध्ये मद्य प्रेमींना लांबच लाबं रांगा लावल्या. कर्नाटक सीमेवरील बेळगाव इथलीही दरुची दुकाने सुरु झाली आहेत.
बेळगाव येथे दारुची दुकाने उघडताच पहिल्या ग्राहकाचे “ग्राहक देवो भव:’ म्हणत ग्राहकाला हार घालून त्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विक्रीला सुरवात करण्यात आली. गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे दारुची दुकानं बंद होती. आज ती उघडली, त्यामुळे तळीरामांचा कोरडा घसा आज ओला होणार असल्याने मद्यप्रेमी खुश असल्याचे चित्र आहे.