पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज, अँग्लो उर्दू बॉईज स्कूल, एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत यश मिळवले.
अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल 99.50 टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल 99 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 84 टक्के इतका लागला.
विज्ञान शाखेतून 84 टक्के गुण मिळवून पटेल अफसा महमद खालिद प्रथम आली. कला विभागात 88 टक्के गुण मिळवून रती पर्वतकर प्रथम आली तर कॉमर्समध्ये मुकादम उमेमा सलीम यांनी 92 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. एमसीव्हीसीमध्ये अन्नूसिंग बिहारिलाल यांनी 82 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, उपाध्यक्ष अबेदा इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख, प्राचार्य गफार सय्यद, उपप्राचार्य तस्नीम शेरकर, हनीफ शेख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अँग्लो उर्दू बॉईज् स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल 99.38 टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल 99.55 टक्के, वाणिज्य शाखेचा 99.56 टक्के तर कला शाखेचा 97.29 टक्के निकाल लागला. मुख्याध्यापक परवीन शेख यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. अथर्व खोत 95.17 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आला. कॉमर्स विभागात आलिद शेख 79.17 टक्के मिळवून प्रथम आला तर खाशमान शेख 81.17 टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आला.
एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल 99.09 टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल 98.90 टक्के लागला. कला शाखेचा निकाल 95 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के इतका लागला. फुरकान खान 81.83 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आला. कॉमर्स विभागात मुस्तकीम राठोड 86 टक्के मिळवून प्रथम आला तर 90.16 टक्के गुण मिळवून तानझीला शेख कला शाखेत प्रथम आली. मुख्याध्यापक शिरीन शेख यांनी कौतुक केले.