प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 13 -महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “भारताची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए.इनामदार यांच्या हस्ते सकाळी सव्वाआठ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख यांनी ही माहिती दिली. यानंतर असेम्ब्ली हॉलमध्ये मराठी लोकनृत्य, लेझीम, गुजराती गरबा, पंजाबी भांगडा, आसाम बिहू, जम्मू-काश्मीर, राजस्थानी अशी लोकनृत्ये सादर करण्यात येणार आहेत. सांस्कृतिक विभाग प्रमुख शबनम पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होणार आहेत.