देशभरात एका दिवसात विक्रमी 1 लाख रुग्ण बरे

नवी दिल्ली – देशभरात एका दिवसात विक्रमी 1 लाख कोविड-19 चे रुग्ण बरे झाले. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात देशभरात विक्रमी 1 लाख 1 हजार 438 रुग्ण करोनामुक्त झाले. 

ही आजवर एकाच दिवसात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या असून, यात 32 हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत. याबरोबरच भारतातले करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के झाले आहे. आत्तापर्यंत देशातले एकूण 44 लाख 97 हजार 867 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. 

याच काळात देशभरात 75 हजार 83 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने, देशभरातल्या करोनाबाधितांच्या एकूण संख्येने 55 लाखाचा टप्पा पार केला आहे. सध्या देशभरातल्या एकूण करोनाबाधितांची संख्या 55 लाख 62 हजारापेक्षा अधिक आहे.

गेल्या 24 तासात देशात 1 हजार 53 जण करोनामुळे दगावल्याने, करोनाबळींची एकूण संख्या 88 हजार 935 झाली आहे. सध्या देशातले करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण 1.6 टक्के इतके आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.