राजगुरूनगर (पुणे)-देशासह राज्यातील लॉकडाऊन टप्प्या टप्प्यात खुले करण्यात आले आहे. त्याप्रमाणे बंद असलेले देवस्थान खुले करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
खेड तालुक्यातील भिमाशंकर देवस्थान भाविकांना खुले करावे, अशी मागणी रिपाइं (आठवले) या पक्षाचे पुणे जिल्हा निमंत्रक तथा खेड तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळस यांनी निवेदनाद्वारे भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्याकडे केली आहे. यावेळी संपर्क प्रमुख विशाल कांबळे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.