आंबेठाण – खराब वाडी तालुका खेड जिल्हा पुणे याठिकाणी काल अभिजित कड यांच्या शेतात मांडूळ जातीचा साप आढळून आला. त्यांनी तात्काळ सर्पमित्र शांताराम गाडे यांच्याशी संपर्क साधला गाडे यांनीदेखील तात्काळ शेतात जाऊन सुरक्षितरित्या मांडूळ जातीच्या सापाला पकडले मांडूळ जातीच्या सापाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होण्याची प्रकरणे होत.
असतात या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडे यांनी तात्काळ मांडुळ घेऊन माळुंगे इंगळे येथील पोलिस चौकीला जाऊन पोलिसांना खबर दिली तसेच त्यांनी चाकण वनविभागाला संपर्क करून वनविभाग चाकण येथील आनंद कुमार इंदलकर वनविभाग अधिकारी यांच्या स्वाधीन केले. यावेळी सर्पमित्र सचिन भोपे पोलीस उपनिरीक्षक विजय सपकाळ पोलीस हवालदार गाडे उपस्थित होते.