Esha Deol : अभिनेत्री ईशा देओल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांपासून ईशा पती भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र अद्याप घटस्फोटच्या या चर्चांवर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु या दरम्यान ईशाने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ईशाने सोशल मीडियावर तिचा पहिला ‘कोई मेरे दिल से पूछे’ सिनेमातील ‘लपक-झपक’ गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या सिनेमाला 22 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कधी-कधी तुम्हाला जाऊ दिलं पाहिजे आणि फक्त स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवत डान्स केला पाहिजे. ’
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, , ‘माझा पहिला सिनेमा आणि मी 18 वर्षांची असल्याची आठवण… गेल्या गुरुवारी 11/1 रोजी माझ्या पहिल्या सिनेमाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. तेव्हा एक पोस्ट करणं राहून गेलं. हा माझा पहिला सिनेमा आहे, त्यामूळे माझ्या कायम लक्षात राहिल….’ असं ईशा हिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, ईशाच्या पहिल्या ‘कोई मेरे दिल से पूछे’ या सिनेमात अभिनेता आफताब शिवदासानी आणि संजय कपूर देखील होते. मात्र ईशा बॉलीवूडमध्ये फार सक्रीय असल्याचे दिसत नाही. दुसरीकडे, ईशा देओलचा पती भरत तख्तानी याच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. यामुळे ती घटस्फोट घेणार असल्याचे म्हंटले जात आहे. भरत तख्तानी हा उद्योजक असून 29 जून 2012 मध्ये त्याचे ईशा देओलसोबत लग्न झाले होते. भरत आणि ईशा यांना दोन मुली देखील आहेत.