चिनी मातीच्या कटोऱ्याला लाखो रुपयांची किंमत

वॉशिंग्टन- भगवान जब देता है तो छप्‍पर फाड़कर देता है हि म्हण अमेरिकेतील  कनेक्टिकट शहरातील एका व्यक्तीच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरली. शहरातील चौकात रस्त्यावर लागलेल्या एका सेलमध्ये या व्यक्तीने फक्त ३५ डॉलरला म्हणजेच २५०० रुपयांना एक चिनी मातीचे भांडे खरेदी केले प्रत्यक्षता हे भांडे त्याच्यासाठी एक अनमोल खजिना ठरले चिनी संस्कृतीतील एक अनमोल ठेवा असलेल्या या भांड्याची खरी किंमत ३लाख डॉलर ते ५ लाख डॉलर म्हणजेच २२ लाख रुपये ते ३५ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे समोर आले आहे.

पांढऱ्या रंगाच्या या कटोऱ्यावर निळ्या रंगाची फुलर चितारण्यात अली आहेत चीनमध्ये १४व्य शतकात हा कटोरा तयार करण्यात आला असावा असा अंदाज आहे. हा कटोरा अतिशय दुर्मिळ मानण्यात येत आहे. कारण अशा प्रकारचे केवळ सातच कटोरे तयार करण्यात आले होते. या  कटोऱ्याचा आता १७ मार्च रोजी लिलाव करण्यात येणार असून त्याला चांगली किंमत मिळणार असल्याने २५०० रुपये देऊन खरेदी करणारी ती व्यक्ती मालामाल होणार आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.