शिक्रापूर,(वार्ताहर)- मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथील किसन मिडगुले यांच्या नातवाला गावातील श्रीमंत मिडगुले याने दारुच्या नशेत विनाकारण मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी किसन मिडगुले श्रीमंतच्या घरी जाऊन जाब विचारात असताना त्यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, श्रीमंतसह त्याच्या पत्नी व आदींनी शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण करीत जखमी केले. दरम्यान किसन यांची पत्नी त्यांना सोडवण्यासाठी आलेली असताना मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या पत्नीला देखील मारहाण केली.
याबाबत किसन भिकाजी मिडगुले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी श्रीमंत भागाजी मिडगुले, धनश्री श्रीमंत मिडगुले, सागर भागा मिडगुले, कमल भागा मिडगुले (सर्व रा. मिडगुलवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करीत आहेत.