चीन – जगभरातील करोनाची चिंता मिटली असताना आता पुन्हा एकदा चीनमध्ये धडकी भरवणारा आजार उद्धभवला आहे. या नवीन आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. चीनच्या शाळांमधील मुलांमध्ये न्यूमोनिया आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे. यामुळे तेथील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, या मुलांमध्ये श्वसन आणि न्यूमोनियाशी संबंधित आजार आढळून आले आहेत. त्याची लक्षणे न्यूमोनियापेक्षा वेगळी आहेत.
चीनमधील सध्याची स्थिती करोना काळाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारी आहे. लहान मुलांना झपाट्याने होणाऱ्या या आजाराबाबत WHOनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. या आजारात मुलांच्या फुफ्फुसात सूज येणे. उच्च तापासह अनेक असामान्य लक्षणे आढळून आली आहेत. याशिवाय नाक वाहणे, खोकला, उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे दिसून येत आहे.
⚠️UNDIAGNOSED PNEUMONIA OUTBREAK—An emerging large outbreak of pneumonia in China, with pediatric hospitals in Beijing, Liaoning overwhelmed with sick children, & many schools suspended. Beijing Children’s Hospital overflowing. 🧵on what we know so far:pic.twitter.com/hmgsQO4NEZ
— Eric Feigl-Ding (@DrEricDing) November 22, 2023
चीनमध्ये पसरणाऱ्या विचित्र प्रकाराबाबत जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO देखील अलर्ट झालं आहे. WHO ने चिनी सरकारकडून मुलांमधील श्वसनाचे आजार आणि न्यूमोनियाबाबत संपूर्ण रिपोर्ट मागवला आहे. या नवीन आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितलं की, चिनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या अधिकाऱ्यांनी 12 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आणि चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे.
WHO ने या रहस्यमयी आजाराच्या उद्रेकासाठी कोविड-19 निर्बंध शिथिल केल्याचा ठपका ठेवलाय. WHOने आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएंझा, SARS-CoV-2, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यासंबंधी अतिरिक्त माहिती मागवली. तसेच हा रोग अत्यंत संसर्गजन्य असू शकतो, असे काही तज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोरोनासारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी त्यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे म्हंटले जात आहे.