नायगाव -पिंपरी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व युवकांसाठी सोळा लक्ष रुपये खर्च करून बहुउददेशीय उद्यान साकारण्यात येणार आहे. सरपंच मीना शेंडकर यांच्या हस्ते संरक्षक भिंत व बहुउद्देशीय उद्यान कामाचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी ग्रामपंचायत कार्यालया लगत उद्यान साकारण्यात येणार आहे.
यामध्ये संरक्षक भिंत बाधणे, स्टेज बांधणे, बगीच्या अंतर्गत लोकांना चालण्यासाठी रस्त्यावर पेव्हींग ब्लॉक बसविणे, गेट बसविणे, झाडे लावणे इत्यादी कामे या निधीतून करण्यात येणार आहे. या उद्यानाच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या खासदार फंडातून 5 लाख रूपये निधी मिळाला असल्याचे सरपंच मीना शेंडकर यांनी सांगितले.
यावेळी कृषिभुषण महादेव शेंडकर, तंटामुक्ती अध्यक्ष संपत शेंडकर, पोलीस पाटील पुनम शेंडकर, सुषमा थेऊरकर, पांडुरंग गायकवाड, संचालक अर्जुन मोघे, संतोष गायकवाड, प्रतिक शेंडकर, अंगणवाडी सेविका सीमा शेंडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.