पिंपरी, (प्रतिनिधी) – भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्यामुळे 17 वर्षे मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १३) दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाकड मधील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारासमोर घडली.
कैलास त्रंबक श्रावणे (वय 28, रा. औंध, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. परमेश्वर मारुती रणदिवे (वय 45, रा. थेरगाव) यांनी गुरुवारी (दि. 14) वाकड पोलीस ठाणे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणदिवे यांच्या सतरा वर्षाचा मुलगा फिनिक्स मॉलच्या समोरून पायी चालला होता. त्यावेळी आरोपी कैलास श्रावणे यांनी भरधाव वेगात दुचाकी चालवून फिर्यादी यांच्या मुलाला धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी कैलास हा घटनास्थळी न थांबता तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला.