काबुल : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. लोक देश सोडण्यासाठी विमानतळाकडे धाव घेत होते. विमानतळावर गर्दी उमटली आहे. याचदरम्यान काबूल एयरपोर्टवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला.
Afghanistan’s tragedy right now in Kabul international airport: Afghan youth on the engine of American plane to leave the country. pic.twitter.com/CoTS8sq9c3
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 16, 2021
काबूल विमानतळावरुन USAF’s च्या C-17A या वाहतूक विमानाने उड्डाण केले . त्यावेळी अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी तरुण थेट विमानाच्या इंजिनवरच बसूनच लँडिंग गिअर पकडून होते.
काबूलमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची ही धडपड होती. परंतु विमानाने उड्डाण करताच लँडिंग गिअर पकडलेले ३ अफगाणी लोक हवेतून खाली पडले असल्याचे व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला. यात हवेतून खाली पडलेल्या व्यक्तीमध्ये नॅशनल फुटबॉल टीमचा खेळाडू झाकी अन्वर असल्याचे म्हंटल जात आहे.
Unseen footage of Kabul airport runway pic.twitter.com/gaDEJKXD91
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 19, 2021
अफगाणीस्थामधील स्थानिक वृत्त माध्यमांनुसार, काबूलमधून बाहेर पडण्यासाठी अफगाणी लोकांची धडपड होती. परंतु विमानामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक भरल्यानंतर काही अफगाणी नागरिकांनी विमान उड्डाण करताच लँडिंग गिअर पकडले होते. यामध्ये जे तीन लोक हवेतून खाली पडले त्यामध्ये नॅशनल फुटबॉल टीमचा खेळाडू झाकी अन्वर स्थानिक माध्यमांनी सांगितले आहे. तर दुसऱ्या एक मृतदेहाची ओळख त्याचा नातेवाईकांना पटली असून हा तरुण १७ वर्षां होता याचे नाव रेझा होते.