नवी दिल्ली – आसाम रायफल्सने मिझोरमच्या सियाहा जिल्ह्यातील तुईसिह गावातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रांस्त्रांचे साठे असलेले गोदाम उघडकीला आणले आहे.
युद्धजन्य स्थितीची तयारी करावी अशी तेथे साठवणूक करण्यात आल्याचे दिसून आले आहे असे आसाम रायफल्सच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. या शस्त्रास्त्र साठ्यांबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही तेथे १५ फेब्रुवारीपासून शोध मोहीम हाती घेतली होती.
त्यावेळी जिलेटिन स्टिक्स -११० नग, सामान्य डिटोनेटर -१०० नग, पॉइंट २२ रिम फायरच्या लहान शस्त्रांच्या राउंड, लांब रायफल बॉल -५० नग, १२ गेज शॉटगन काडतूस -२० नग आणि मोठ्याप्रमाणावरील सेफ्टी फ्यूज आणि अन्य सामग्री सापडली असून या जप्त केलेल्या सर्व वस्तू तुईपांग पोलिस स्टेशनला सुपूर्द करण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले.