पुणे :गुन्हा मागे घेत नसल्याने छातीत खुपसला चाकू

पुणे – गुन्हा मागे घेत नसल्याने एका तरुणाच्या छातीत चाकू खूपसून खूनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुजरवाडी येथील खोपडेनगर येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विशाल उर्फ मोन्या फाटे (रा.कात्रज गाव) या सराईताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आकाश राजु पाटणकर (23,रा.खोपडेनगर) याने फिर्याद दिली आहे.

आकाश हा दुचाकीवरुन जात असताना त्याला विशालने रस्त्यात अडवले. यानंतर तुला लय माज आलाय का खल्लास करुन टाकतो असे म्हणत चाकु त्याच्या छातीत खुपसला. या घटनेत आकाश गंभीर जखमी झाला आहे.

यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले, विशाल हा सराईत गुन्हेगार आहे, त्याने 2017 मध्ये आकाशवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. यावेळी आकाशने त्याच्याविरुध्द तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी विशालने त्याच्यामागे तगादा लावला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मचाले करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.