गेल्या अकरा वर्षांपासून शिरूर तालुक्याच्या एकोणचाळीस गावांचा कायापालट झाला या भागाचे प्रतिनिधित्व आदरणीय वळसे पाटील साहेबांकडे आल्यानंतर शिरूरच्या या जनतेने शाश्वत विकास अनुभवला. या भागातील समस्यांवर साहेबांचे लक्ष असते. शेतकरी केंद्रबिंदू मानून साहेबांनी या भागात वेळ नदीवर बंधारे बांधून शेतकरी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला. केंदूर येथील आरोग्य केंद्रांची इमारत असेल पाबळ आणि मलठण येथील सुसज्ज रुग्णालये त्याचबरोबर रांजणगाव गणपती, मोराची चिंचोली, कवठे यमाई, कान्हूर मसाई, टाकळी हाजी, निघोज, केंदूर आदी गावांमध्ये तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने केलेला विकास सर्वांनी पाहिला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विकासाची धुरा सांभाळत असताना मतदारसंघात देखील शाश्वत विकास काय असतो हे दाखवून देणारे राज्याचे ज्येष्ठ नेते, आंबेगाव-शिरूर तालुक्याचे भाग्यविधाते कामगार व उत्पादन शुल्कमंत्री आदरणीय श्री. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा आज वाढदिवस. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गृहिणीला साहेबांनी तालुक्याच्या पंचायत समिती उपसभापती पदावर काम करण्याची संधी दिली. गेल्या आठ महिन्यांपासून जग करोनाच्या साथीमुळे हैराण आहे. मात्र, साहेब राज्याची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवताना मतदारसंघातील जनतेला वेळोवेळी करोनाच्या संकटातून दूर ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. निसर्गचक्री वादळ असेल किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले; मात्र, साहेबांच्या सूचनेनुसार प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले. त्यांना भरपाई मिळवून देण्यात साहेबांचा मोठा वाटा राहिला.
देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार माझ्यासारख्या सर्वसामान्य गृहिणीला देखील प्रेरित करतात. पवार साहेबांच्या विचारानुसार आदरणीय वळसे पाटील साहेबांनी देखील महिलांनी राजकारणात सक्षम असावे, यासाठी अनेक धडे दिले. यामध्ये साहेबांच्या पत्नी सौ. किरणताई वळसे पाटील या देखील अनुसया महिला उन्नती केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहेत. या सगळ्या धावपळीच्या जीवनात साहेब सर्वसामान्य कुटुंबाच्या सुख – दुःखात देखील सहभागी होतात. माझे पितृछत्र हरपल्यानंतर साहेबांनी आणि किरणताई यांनी सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. या महान नेत्याचा आज वाढदिवस आदरणीय श्री. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…
– सविताताई प्रमोदशेठ पऱ्हाड
उपसभापती, पंचायत समिती, शिरूर