अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा हात

डॉ सागर शिंदे यांचा कौतुकास्पद उपक्रम
जामखेड: डॉ सागर कुंडलिकराव शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील ११ अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. श्री नागेश विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शालेयपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

शिंदे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. त्यामुळे या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे. याप्रसंगी डॉ सागर शिंदे. डॉ मयुरी शिंदे. विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडखे उपमुख्याध्यापिका आशा भोसले पर्यवेक्षक हरिभाऊ ढवळे, प्रकाश तांबे, रमेश बोलभट, महादेव साळुंके, संतोष पवार, दिपक सांगळे, मयुर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे व विकासाला गती देणे यासाठी हा उपक्रम हाती घेतलेला आहे असे मनोगत डॉक्टर सागर शिंदे यांनी व्यक्त केले.प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी शिंदे यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश बोलभट व आभार प्रदर्शन महादेव साळुंके यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.