चिंचवड स्टेशन येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी: दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना चिंचवड स्टेशन येथून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी सकाळी घडली आहे. गोरख बच्चन गुप्ता (वय 21, रा. मोई, ता. हवेली,) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर गुप्ता हे चिंचवडच्या दिशेने येत होते. तर मोटार चालक केएसबी चौकाच्या दिशेने जात होते. दुचाकीस्वाराचा तोल जाऊन ते खाली पडले. दुचाकीसह घसरत ते मोटारीला जाऊन आदळले.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गुप्ता यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गुप्ता यांची ओळख पटेल असे कोणतेही कागदपत्र नव्हते. परंतु गुप्ताच्या मित्राचा फोन आल्याने त्यांची ओळख पटली. याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.