नवी दिल्ली : केदारनाथमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा पोहचली नाही.पण हेलिकॉप्टरने बरेच नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
#Uttarakhand: 6 passengers injured after UT Air helicopter crash lands during take-off at Kedarnath helipad, the rear part of the helicopter hit the ground; all 6 passengers are safe. pic.twitter.com/osrRGFQhtX
— ANI (@ANI) September 23, 2019
केदारनाथमधील हेलिपॅडवर आज सकाळी 11.23 वाजता हेलिकॉप्टर उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच त्याचा अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि सहा प्रवासी होते, असे सांगण्यात आले. 2017 मध्ये केदारनाथमधील हेलिपॅडवर हेलिकॉप्टरचा असाच अपघात झाला होता. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताची ही 7 वी घटना आहे. 2010 पासून उत्तराखंडमध्ये नऊ हेलिकॉप्टर क्रॅशच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत 27 लोकांचा बळी गेला आहे. केदारनाथच्या खोऱ्यात एमआय -17 सह सात हेलिकॉप्टरला अपघात झाले आहेत.