मुंबई – ‘एक विलन’ चित्रपटानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख दोघेही पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ‘मरजावां’ चित्रपटात दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील सिद्धार्थ आणि रितेशचा नवा लूक समोर आला आहे.
Sidharth Malhotra and Riteish Deshmukh… Here’s a glimpse of the two actors from #Marjaavaan, who reunite after the hugely successful #EkVillain… Directed by Milap Milan Zaveri… 8 Nov 2019 release. pic.twitter.com/P1VgxU6kne
— taran adarsh (@taran_adarsh) September 23, 2019
चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटातील या दोघांची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री रकुल प्रित सिंग ही देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वीही सिद्धार्थ आणि रितेशचे दोन लूक प्रदर्शित करण्यात आले होते.
दरम्यान, मरजावा चित्रपटानंतर सिद्धार्थ ‘शेरशाहं’ चित्रपटात भूमिका साकारणार आहे. तर, रितेश देशमुख ‘बागी ३’ आणि ‘हाऊसफूल ४’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.