‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमावरून चिदंबरम यांची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम सध्या आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात तिहार कारागृहात आहेत. आज सकाळी कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कार्ती चिदंबरम त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. या बैठकीनंतर पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या हाऊडी मोदी कार्यक्रमावरून टीका करणारे एक ट्‌वीट केले आहे. भारतात सर्व काही चांगले आहे. बेरोजगारी, जमाव हिंसाचार, काश्‍मीर बंद यावर त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून मोदी आणि सरकारवर निशाणा साधला. याशिवाय सोनिया आणि मनमोहन यांना भेटण्यासाठी आल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

पी.चिदंबरम यांनी आपल्या कुटूंबियांना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यास सांगितले होते. याविषयीची माहिती त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी ट्विटच्या सुरूवातीलाच दिली. तसेच श्रीमती सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग मला भेटायला आल्याबद्दल मला आज खूप आनंद होत आहे.’ जोपर्यंत कॉंग्रेस पक्ष सशक्त आणि धैर्यवान आहे तोपर्यंत मीही मजबूत आणि धैर्यवान राहील. ‘ असे त्यांनी म्हटले. तसेच ते पुढे म्हणाले, ‘बेरोजगारी, कमी वेतन, झुंड हिंसाचार, काश्‍मीरमध्ये लॉकआऊट, बेरोजगारी आणि विरोधी नेत्यांना तुरूंगात टाकणे या सर्वांव्यतिरिक्त भारतात सर्व काही ठीक आहे.’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.  दरम्यान, वडील पी. चिदंबरम यांची भेट घेतल्यानंतर कार्तीने, ‘कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज त्यांना भेटायला आणि पाठिंबा दर्शविल्याबद्दल माझे वडील व माझे कुटुंबीय त्यांचे आभारी आहेत, या राजकीय लढाईत आमच्यासाठी हे एक मोठे प्रोत्साहन असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.