रावणगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी (ता. दौंड) या शाळेतील विद्यार्थ्यांनी “एक मूठ धान्य माकडांसाठी’ हा उपक्रम राबविला असून पहिली ते सातवीच्या मुलांनी 325 किलो धान्य शाळेत जमा केले असून, ते रावणगाव येथील माकडांसाठी दिले आहे.
रावणगाव (ता. दौंड ) येथे शिरसाई देवीच्या मंदिर परिसरात अनेक माकडे आहेत. अन्नाच्या शोधात ते फिरत असतात. गावातील सामाजिक कार्यकर्ते दानशूर संस्थांना, संघटनांना माकडांसाठी धान्य मिळावे म्हणून आवाहन करीत असतात. या आहवानाला प्रतिसाद देत गेल्या वर्षीही खडकी शाळेने 225 किलो धान्य जमा केले होते.
उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका अमिना सय्यद, सुरेश वाळके, गजेंद्र गायकवाड, विद्या जगताप, वर्षा कांबळे, शिवकांत अडसूळ, सारिका जाधव, कौशल्या वणवे, अनिल गायकवाड, राहुल बनसोडे, प्रतापराव माने, प्रकाश बनसुडे या शिक्षकांचे सहकार्य मिळाले.