शाहीनबागमध्ये गोळीबार : तणाव, जमावाने पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या (का) विरोधातील देशव्यापी जन आंदोलनाचे जन्मस्थाम मानल्या जाणाऱ्या शाहीनबाग येथे एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. त्या कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यामुळे तेथील तणावात भर पडली आहे. दिल्ली निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या हल्ल्यांकडे राजकीय दृष्टीने पाहिले जात आहे.

हल्ल्याची ही घटना दुपारी चार वाजून 53 मिनिटांनी घडली. हल्लेखोराने आपले नाव कपील गुज्जर असे सांगितले आहे. नोईडाच्या सीमेवरील दल्लुपुरा गावावतील तो रहिवासी आहे. दिल्लीचे पोलिस उपायुक्त चिन्गमय बिस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने हवेत गोळीबार केला. त्याच्यावर तातडीने ताबा मिळवण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओत हा तरूण बडबडत असल्याचे दिसत आहे. हमारे देशमें सिर्फ हिंदुओंकी चलेगी और किसी की नही, असे तो म्हणत आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे सुरू असणाऱ्या आंदोलनावर गोळीबार करण्याच्या घटनेला दोन दिवस होता न होताच तो ही घटना घडली आहे. त्या दिवशी निदर्शक शांततेत महात्मा गाधी यांच्या समाधीस्थळाकडे मोर्चा घेऊन जात होते.

सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरीकत्व पट यांच्या विरोधात गेल्या दीड महिन्यांपासून शांततेत निदर्शने सुरू आहेत. हा कायदा भेदभाव करणारा आणि मुस्लिमांच्या हक्क काढून घेणारा आहे, अशी त्यावर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात देशभर असंतोष पसरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.