सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवार दि. ८ रोजी सायंकाळी ६ वाजता शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे महायुतीचा सातारा व जावली तालुक्याचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
या मेळाव्याला महायुतीचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास सातारा आणि जावली तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सर्व नागरिक, ग्रामस्थ आणि माता- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.