पुणे -पीएमपी बसमध्ये प्रवासादरम्यान एका महिलेची सोन्याची बांगडी कापून चोरण्यात आली. मागील काही दिवसांत गळ्यातील दागिने चोरण्याऐवजी हातातील बांगडी कापून चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. ही बांगडी अशा पद्धतीने कापून लांबवली जाते की महिलेला याची कल्पनासुद्धा येऊ शकत नाही.
याप्रकरणी एका 64 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला शनिवारी सकाळी भेकराईनगर ते आळंदी असा प्रवास करत होती. गाडीतळ ते वैदुवाडी बस प्रवासादरम्यान गर्दीमध्ये कोणीतरी त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी चोरली. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एच. आर. जोशी करत आहेत.