भूत म्हटले की कोणाच्याही चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. त्यात एक भूत चक्कअभिनेत्रीच्या घरात राहत होते. बॉलीवूडमधील नवोदित अभिनेत्री अलाया फर्निचरवालाच्या घरात हे भूत राहत होते. असा खुलासा चक्क अभिनेत्रीनेच केला आहे. हा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.
अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलायाने नुकतेच बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. पण पहिल्याच चित्रपटापासून तिने सगळ्यांकडून कौतुक मिळवले आहे, तर आता तिने एका मुलाखतीत तिच्या घरात भूत राहत होते, असा खुलासा केला आहे. ती म्हणाली, “मी न्यूयॉर्कला ज्या घरात राहून अभ्यास करायची तिथे भूतही राहत होते.
अर्ध्या रात्री मला पावलांचे आवाज यायचे, तर कधी-कधी आपोआप शॉवर चालू व्हायचा. अनेक भयावह गोष्टी घडायच्या. अलाया म्हणाली की, एक दिवस मला लाइटच्या प्रकाशातून काहीतरी निघाल्यासारखे वाटले आणि मला असं वाटलं की काहीतरी मला स्पर्श करून गेले.
तेव्हा मला निश्चितपणे वाटले की येथे काहीतरी गडबड आहे. यामुळे मला घरी अजिबात जावेसे वाटत नव्हते, असे तिने सांगितले. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अलायाने नितीन कक्करच्या “जवानी जानेमन’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पहिल्याच चित्रपटातून तिने चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. इतकेच नव्हे तर फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्डही तिने पटकाविला आहे.