मुंबई – ‘डॅडी’ अर्थात कुख्यात गॅंगस्टार अरुण गवळी हे आता आजोबा झाले आहेत. त्यांची लाडकी लेक योगिता गवळी हिने नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. गेल्या वर्षी ८ मे रोजी लॉकडाउनमध्ये अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी हे दोघे लग्नच्या बेडीत अडकले.
View this post on Instagram
योगिता गवळीने ७ मे २०२१ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, आता आजोबा अरुण गवळींनी नुकतीच नातीची भेट घेतली आहे. आजोबा आणि नातीच्या भेटीचे फोटो अक्षय वाघमारेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अरुण गवळी नातीला त्यांच्या मांडीवर घेऊन तिच्याकडे पाहून हसत असल्याचं दिसत आहे. नातीला भेटण्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. सध्या या फोटोने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram