वडगाव मावळ – अन्न व पाण्याच्या शोधात इंदोरी बाह्यवळण रस्त्यावर आलेल्या कोल्ह्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी इंदोरी, ता. मावळ येथे घडली.
मावळ तालुक्यात वनपरिक्षेत्र हद्दीत उन्हाळ्यात वन्यजीवांना अन्न व पाण्यासाठी नागरीवस्तीचा आधार घ्यावा लागत आहे. दरवर्षी अनेक वन्यजीवांचा बळी जात असून इंदोरी बाह्यवळण रस्त्यावर आलेल्या कोल्ह्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी ज्ञानदेव ढेंबरे, वनरक्षक काळूराम कड, वनसेवक कोंडिबा जांभुळकर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य नीलेश गराडे, भास्कर माळी, अवि कार्ले, जिगर सोलंकी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कोल्ह्याला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मृत्यू झाला.